‘…तर इन्किलाब बच्चन असतं नाव’

March 3, 2014 10:05 PM0 commentsViews: 1861

03 मार्च : ‘नावात काय असतं’ असं म्हटलं जात पण अमिताभ बच्चन हे नाव जरी घेतलं तरी बाकी सांगायची गरज पडत नाही. पण या नावामागची गोष्ट ऐकण्याची पर्वणी आज (सोमवारी)पुणेकरांना मिळाली. ते ही खुद्द बीग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडुन..पुण्यामध्ये आज संगीत कला टाईम्सच्या वतीने अमिताभ बच्चन यांना पुणे पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ही गोष्ट सांगितली. आपल्या आईची सामाजिक जाणीव आणि देशप्रेम पाहुन वडिलांच्या मित्रांनी आपलं नाव इन्किलाब असं ठेवलं जावं असं सुचवलं होतं. मात्र वडिलांच्याच एका साहित्यिक मित्राने अमिताभ हे नाव सुचवलं आणि मग आपलं नाव अमिताभ बच्चन असं झालं असा खुलासा अमिताभ यांनी केला.

close