सुप्रीम कोर्टाच्या आवारात सुब्रतो रॉय यांच्यावर फेकली शाई

March 4, 2014 2:18 PM1 commentViews: 1194

subrata roy04 मार्च :  गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये परत करण्यासंबंधीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात एका व्यक्तीनं शाई फेकली.

आज दुपारी (मंगळवारी) सुब्रत रॉय पोलिसांसह सुप्रीम कोर्टाच्या आवारात आले, त्यावेळी एका तरूणाने अचानक त्यांच्यालर काळी शाई फेकली. घडलेल्या प्रकारासह रॉय व पोलिस दचकले, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले.मनोज शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. आपण वकील आहोत असा दावा त्यानं केला आहे. रॉय यांनी लोकांची जी फसवणूक केली त्याच्या निषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान रॉय यांच्या खटल्याची सुनावणी दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.

रॉय यांच्या दोन कंपन्यांना गुंतवणूकदारांचे २0 हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले असून, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. याप्रकरणी न्यायालयाची अवमान झाल्याचेही प्रकरण निर्माण झाले असून, रॉय अडचणीत सापडले आहेत.

  • ganesh

    i support to Subrato Roy

close