मुलभूत सुविधांची कमतरता

March 4, 2014 3:24 PM0 commentsViews: 36

मनोज देवकर, ठाणे

04 मार्च :  निवडणूका जवळ आल्यानं सर्वच पक्षांचे नेते आता जनतेच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी लोकांपर्यंत जात आहेत. पाच वर्ष दिलेली आश्वासन आणि जनतेच्या कायम असलेल्या समस्या यामुळे नेत्यांनाही जरा धास्तीच आहे. ठाण्याच्या वेगानं वाढणार्‍या घोडबंदर परिसरात आलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं.

ठाण्याचा सर्वाधिक वेगानं वाढणारा भाग म्हणजे घोडबंदर रोड. गगनचुंबी इमारती, अलिशान शोरूम्स, आणि मोठमोठे मॉल्स असणारा भाग. मात्र मुख्य रस्ता सोडला तर या भागात मुलभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहे. धड रस्ते नाहीत आणि टीएमसीचं पाणीही नाही… लाखोपये खर्चुन घेतलेल्या फ्लॅटमध्ये आता राहायचं तरी कसं, असा प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या नेत्यांना नागरिकांनी विचारला आहे.

महापालिकेचे पाणी नसल्याने या भागात टँकर्स माफियांची दादागीरी आहे आणि त्याला साथ आहे बिर्ल्डर्स लॉबीची. संघवी हिल्स या सोसायटीमध्ये तर महापालिकेचं पाणीच येत नाही मात्र लाखो रूपयांचं बील सोसायटीला आलं आहे.

नागरिकांच्या तक्रारी ऐकून नेत्यांनी नेहमीप्रमाणंआश्वासनं दिलीत.

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी साधं पाणीपुरवढ्याची सोय करत नसतील तर यांना मतं तरी का द्यायची, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

close