बिल गेट्स फोर्बजच्या यादीत पुन्हा नंबर वन

March 12, 2009 12:13 PM0 commentsViews: 6

12 मार्च मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी फोर्बजच्या यादीत पुन्हा एकदा पहिला नंबर पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ वॉरन बफेट यांचा नंबर आहे. मंदीच्या काळात या श्रीमंत लोकांच्या खजिन्यावरही परिणाम जाणवतोय. बिल गेट्स यांची सध्या 40 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मंदीमुळे त्यांना 18 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. वॉरन बफेट यांचं 25 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. 35 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले मॅक्सिकोचे टेलिकॉम किंग कार्लोस स्लीम तिस-या नंबरवर आहे. फोर्बजच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिऴालाय. त्यांच्यापाठोपाठ लक्ष्मीकांत मित्तल आहेत. फोर्बजच्या यादीत हे दोघंही टॉप 20मध्ये आहेत. 1125 श्रीमंत लोकांमध्ये यंदा फक्त 793 जणांनाच फोर्बजच्या यादीत स्थान मिळालंय.

close