रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले

March 4, 2014 5:05 PM0 commentsViews: 2058

ukraine04 मार्च : युक्रेनमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढलाय. युक्रेनमधल्या क्रिमियात रशियानं सैन्य घुसवल्यानं अमेरिकेनं तीव्र संताप व्यक्त केलाय.

अमेरिकेनं रशियासोबत नियोजित केलेली व्यापारी चर्चा रद्द केलीय. तर, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांनी मदतीचं आवाहन केलं. रशियानं गेल्या आठवड्यात 16 हजार पेक्षा जास्त सैन्य क्रिमियात घुसवलंय. युक्रेनला कट्टरतावाद्यांकडून धोका आहे.

तिथली लोकशाही जपण्यासाठी आणि तिथल्या लाखो रशियन लोकांचं रक्षण करण्यासाठी सैन्य पाठवल्याचा दावा रशियानं केलंय. दरम्यान, युद्ध पेटण्याच्या भीतीनं तेलांचे दर भडकले आहे. तर रशियात शेअर मार्केटही घसरले आहे.

close