राहुल गांधींच्या सभेलाही पावसाचा फटका

March 4, 2014 5:08 PM0 commentsViews: 985

75645rahul sabha abad04 मार्च : अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका फक्त शेतीलाच नाही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेलाही याचा फटका बसला. औरंगाबादमध्ये बुधवारी सांस्कृतिक मैदानावर राहुल गांधींची नियोजित सभा होणार आहे.

सभेसाठी भव्य मंडपही टाकण्यात आला होता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने सभेचा मंडप पडला. सभेच्या ठिकाणी आता पूर्णपणे पाणी साचलंय. मात्र मंडपातील पाणी युद्ध पातळीवर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चिखलावर बारीक खडी टाकून जागा कोरडी केली जात आहे.

आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सभामंडपाची पाहणी केली. जवळपास एक लाख नागरीक सभेला येतील असा अंदाज आहे. सभा उद्या एक वाजता सुरू होणार आहे. उद्या सभेवेळी पाऊस येतो की काय अशी धाकधूक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

close