महागाईचा दर खाली आला

March 12, 2009 10:56 AM0 commentsViews: 1

12 मार्चमहागाई दराची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली. यावेळी 28 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दर 2.43 टक्के इतका झाला आहे. जून 2002 सालानंतर महागाई दर प्रथमच एवढ्या खालच्या स्तरावर पोचला आहे. अर्थातच सामान्यांच्या तसंच सरकारच्याही दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. गेल्या 21 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दर होता 3.03 टक्के . महागाई दरात गेल्या तीन महिन्यात झपाट्यानं घसरण होताना दिसत आहे. सतत तीन आठवडे महागाईचा हा दर 4 टक्क्यांपेक्षाही खाली येतोय. प्रामुख्यानं भाज्या, फळं तसंच इतर खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाल्यामुळे महागाई दर कमी होताना दिसतोय.महागाई दराच्या पाठोपाठच देशातल्या औद्योगिक उत्पादनाच्या दराची आकडेवारीही जाहीर झाली. औद्योगिक उत्पादनाचा दर -0.5 टक्क्यांवर पोचला आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा दर – 0.8% इतका कमी झाला आहे तर मायनिंग क्षेत्राचा दर झालाय – 0.4 टक्के इतका झाला आहे. मात्र यावेळी कॅपिटल गुड्स , कन्झ्युमर गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढ झालेली दिसत आहे.

close