लोकसभा निवडणुकांच्या तारखा उद्या जाहीर

March 4, 2014 7:33 PM0 commentsViews: 907

election 201404 मार्च : लोकसभेच्या प्रचारासाठी हातात झेंडे, भोंगे घेऊन सज्ज असलेल्या राजकीय पक्षांना बुधवारी ‘खो’ मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. याच पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त. व्ही. एस. संपथ निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात ताबडतोब आचारसंहिता लागू होणार आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेण्यावर निर्बंध लागणार आहे. या आधीच्या म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुका 5 टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी लोकसभाच्या निवडणुका 5 ते 7 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे महिन्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे त्याअगोदरच निवडणुका घेण्यात येईल आणि नव्या लोकसभेची सुरूवात होईल.

close