आगामी टेस्ट मॅचसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

March 12, 2009 1:10 PM0 commentsViews: 4

12 मार्चभारताबरोबरची वन डे सीरिज न्यूझीलंडने गमावली. पण आगामी टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड निवड समितीने त्याच टीमवर विश्वास दाखवलाय. पहिल्या टेस्टसाठीही टीममध्ये फारसे बदल केलेले नाहीत. टी – 20 आणि वन डे सीरिजमध्ये शानदार कामगिरी करणा-या मार्टिन गुप्तीलला 13 जणांच्या टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. तर दुखापतग्रस्त जेकब ओरम ऐवजी जेम्स फ्रँकलिनची टीममध्ये निवड झाली आहे. भारत – न्यूझीलंड दरम्यान पहिली टेस्ट येत्या बुधवारी हॅमिल्टनमध्ये होणार आहे. तर पुढच्या दोन टेस्ट नेपिअर आणि वेलिंग्टनमध्ये होणार आहेत. पाचव्या आणि शेवटच्या वन डेसाठी हॅमिल्टन वन डेमध्ये खेळलेली टीमच कायम ठेवण्यात आली आहे.

close