आयसीसीच्या टेस्ट बॉलर्सच्या क्रमवारीत इशांत शर्मा 20 व्या क्रमांकावर

March 12, 2009 2:36 PM0 commentsViews: 2

12 मार्च, मुंबई पुढच्या आठवड्यापासून भारत आणि न्यूझीलंड दरम्यान टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. या टेस्ट सीरिजच्या निमित्तानं इशांत शर्मासाठी एक चांगली बातमी आहे. इशांतनं आयसीसीच्या टेस्ट बॉलर्सच्या क्रमवारीत पहिल्या 20 बॉलर्समध्ये प्रवेश केला आहे.दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धची दुसरी आणि तिसरी वन डे इशांत खेळू शकला नव्हता. पण चौथ्या वन डेमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली.टेस्टमध्येही इशांतची कामगिरी सातत्यानं चांगली होत आहे.ऑस्ट्रेलियाचा बॉलर मिशेल जॉन्सन नव्या क्रमवारीनुसार आता दुसर्‍या स्थानावर पोहोचलाय. बॅट्समनच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजच्या शिवनरेन चंदरपॉलनं पाकिस्तानच्या युनिस खानला मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांक पटकावला आहे. भारताचा गौतम गंभीर 9व्या स्थानावर कायम आहे तर त्याचा ओपनींग पार्टनर सेहवाग 12व्या स्थानावर घसरलाय. तर सचिन तेंडुलकर 18व्या क्रमांकावर आहे आणि टीम इंडिया तिसर्‍या स्थानावर कायम असून ऑस्ट्रेलिया पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

close