लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज होणारची घोषणा

March 5, 2014 9:14 AM0 commentsViews: 2155

Image img_184562_election_240x180.jpg05 मार्च :  लोकसभा निवडणुकीसाठीच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. 16व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता याविषयीची घोषणा करणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत आणि निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मासोबत एस. एन. ए. झैदी आज पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करतील. आयोगाचे मुख्यालय असलेल्या निर्वाचन भवनाऐवजी विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद होईल.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मतदानाला सुरू होणारी निवडणूक सहा किंवा सात टप्प्यांत घेतली जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सात ते दहा एप्रिलदरम्यान निवडणूक सुरू होण्याचा अंदाज आहे.

आज निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ताबडतोब आचारसंहिता लागू होईल. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मात्र, आचारसंहितेमुळे त्यामध्ये काही निर्णय घेता येणार नाहीत.

या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती. विद्यमान लोकसभेचा कालावधी एक जूनला संपत असल्यामुळे 31 मेपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्‍यक आहे.

close