सामनाच्या अग्रलेखातून राज – गडकरींचा घेतला समाचार

March 5, 2014 12:19 PM1 commentViews: 2105

udhav raj gadu05 मार्च : भाजपचे नेते नितीन गडकरी हे एक पक्के व्यापारी गृहस्थ आहेत, याविषयी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात तरी शंका राहिलेली नाही. सहकार, ऊर्जा, साखर, इथेनॉल, पाणी शुद्धीकरण अशा क्षेत्रांत तर गडकरी यांनी कर्तबगारीची ‘पूर्ती’ करून एक उत्तम व्यापारी म्हणून कीर्ती मिळवली आहेच, पण राजकारणातही कोणतेही भांडवल भरीस न घालता हवे ते मिळविण्याची कला त्यांनी प्राप्त करून घेतली आहे. नितीन गडकरी यांचे कसब असे की, त्यांनी ‘मनसे’प्रमुखांच्या हातावर दक्षिणा न ठेवता पाठिंबा मिळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे व कोणताही ‘टोल’ न देता न घेता ‘मनसे’प्रमुखांनी त्यास होकार दिल्याची बातमी फुटली आहे. जगाच्या राजकारणात इतका स्वस्त व मस्त सौदा आतापर्यंत झाला नसेल व त्याबद्दल गडकरी यांच्या व्यापारी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जणू तागडीही त्यांची, मालही त्यांचा व गल्लाही त्यांचाच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ‘सामना’च्या अग्रलेखातून नितीन गडकरींवर हल्लाबोल केला आहे.

राज – गडकरी भेटीमुळे संतापलेल्या उध्दव ठाकरेंनी बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून गडकरी व मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. मनसेने लोकसभा निवडणूक न लढवता काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळावे असा बिनभांडवली प्रस्ताव मांडणारे गडकरी उत्तम व्यापारी आहेत असा चिमटा उध्दव ठाकरेंनी काढला आहे.  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मोदींची हवा आहे. मोदी हे  महान असतील तर राज्यातील जनता त्यांना मत देईलच. त्यामुळे ‘कोणी’ मतविभागणीची चिंता करु नये असे उध्दव ठाकरेंनी म्हटले आहे. तर टोल आंदोलन फसले त्याप्रमाणे राजकारण व भविष्यही फसेल या भितीने मनसेच्या ‘महाशयां’नीही गडकरींचा प्रस्ताव स्वीकारला असावा असा टोला उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.

गडकरींचा सत्यनारायण
गडकरी आणि ठाकरेंच्या भेटीवर मार्मिक टोला लगावताना ठाकरे म्हणतात, गडकरींचे कसब असे की त्यांनी मनसे प्रमुखांना सत्यनारायणाच्या पुजेला बोलावले. पण त्यांना प्रसाद मिळणार नाही असे बजावले. असा सत्यनारायण कधीच झाला नसेल.

  • Mondrahul

    Raj is like Bar girl, who throws more money, he performs and his chamchas follow him.

close