केजरीवाल मोदींच्या बालेकिल्ल्यात !

March 5, 2014 2:33 PM0 commentsViews: 1114

kejriwal modi05 मार्च : दिल्लीचे तख्त सोडल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची देशभरात झाडू यात्रा सुरू आहे. आजपासून चार दिवस केजरीवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गुजरातमध्ये आहेत. अहमदाबाद ते भूज असा रोड शो ते करणार आहेत.

दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी ते अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका करत थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अंबानींना गॅसच्या किमती किती दराने देणार असा सवाल केजरीवाल यांनी विचारलाय.

पण मोदींनी केजरीवाल यांच्याकडे सपेशल दुर्लक्ष केलं. त्यामुळे अंबानी आणि मोदी यांच्यात सेटिंग झाली असा आरोपही केजरीवाल यांनी केला आता केजरीवाल मोदींच्याच बालेकिल्ल्यात दाखल झाले आहे. दरम्यान, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती चुकीची असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

close