स्त्री-भ्रूणहत्त्येवर सिनेमा येतोय चिंगी

March 12, 2009 2:37 PM0 commentsViews: 4

12 मार्च, मुंबई रचना सकपाळ विविध विषयांचे सिनेमे मराठी मातीत रूजत असतानाच स्त्री-भ्रूणहत्त्या या एका गंभीर विषयावर एक सिनेमा येत आहे. त्या सिनेमाचं नाव आहे चिंगी. विनोदी सिनेमांच्या ट्रेंडमध्ये हा सिनेमा कितपत यशस्वी होईल हे तो रिलीज झाल्यावर कळेलच. या सिनेमात मिलिंद गवळी आणि गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चिंगीमध्ये मिलिंद गवळीनं रोहन दातेची भूमिका वठवली आहे. सिनेमाविषयी मिलिंद गवळी सांगतो, " सिनेमाची कथा एका जोडप्याची आहे. त्या जोडप्यांना मूल होणार असतं. माझं कॅरेक्टर स्त्री भ्रूणहत्त्येच्या बाजूनं नाही. स्त्रियांना तो नक्कीच आवडेल. मला या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहेत. " वेगळ्या विषयाचा सिनेमा असल्यानं गिरिजालाही भरपूर अपेक्षा आहेत.

close