‘आप’चे नेते आशुतोष यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

March 6, 2014 11:14 AM1 commentViews: 1186

ashutosh protest06 मार्च : आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील मुद्यांची लढाई आता गुद्यावर आलीय. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये अडवल्यामुळे संतप्त ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत राडा केल्या प्रकरणी ‘आप’च्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एफआयआरमध्ये ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष व नेत्या शाजिया इलमी यांचाही समावेश आहे.

भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास ही तुंबळ हाणामारी पेटली होती. दिल्ली पोलिसांनी शिवीगाळ करणार्‍या  भाजप कार्यकर्त्यांऐवजी आप कार्यकर्त्यांवरच पाण्याचे फवारे मारले होते. या हाणामारीत 28 जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. आपचे नेते आशुतोष यांनीही आपल्याला या मारहाणीत अनेक जखमा झाल्याचे सांगितले. सुमारे तासभर चाललेल्या या तुंबळ घोषणायुद्धातून आगामी लोकसभा निवडणूक दिल्लीत तरी भाजप व आप यांच्यातच रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसते.

दरम्यान, भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी या घटनेनंतर, आगामी काळात आप नेत्यांसह कार्यकर्त्यांवर भाजप देशभरात पोलिस केसेस दाखल करण्याची जाहीर धमकी दिली आहे.

  • Amit Shinkar

    Aashutosh cheated the Viewers by doing Partial Journalism for AAP! SHAME on this FAKE REPORTER turned POLITICIAN!!!

close