इस्त्रोचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

March 12, 2009 4:26 PM0 commentsViews: 3

12 मार्च, मुंबईसंदीप श्रीकांत चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यशवंतराव चव्हाण या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार इस्रोचे अध्यक्ष डॉ. जी. माधवन नायर यांनी स्वीकारला. हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अनेक अपयशांवर मात करत मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कमी खर्चात इस्रोने ही चांद्रयान मोहीम यशस्वी केली. त्यांच्या या कामामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली, अशा शब्दात माशेलकर यांनी इस्रोच्या कामाचं कौतुक केलं.

close