दिल्ली हायकोर्टाने ‘गुलाब गँग’च्या रिलीजवर देशभरात घातली बंदी

March 6, 2014 12:05 PM0 commentsViews: 2512

Gublab Gang05 मार्च :  दिल्ली हायकोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमाच्या रिलीजवर देशभरात बंदी घातली आहे. हायकोर्टाने 8 मेपर्यंत या सिनेमावर बंदी घातली आहे. ‘गुलाब गँग’ 7 मार्च रोजी म्हणजेचं उद्या रिलीज होणार होता.

 ‘गुलाब गँग’ बुंदेलखंड (बांदा)च्या गुलाब गँग आणि कमांडर संपत पाल यांच्या जीवनपटावर रेखाटलेला आहे. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी निर्माता आणि दिग्दर्शकांनी संपत पाल यांच्याशी कोणताही संपर्क साधला नव्हता,’ असं हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेत सांगितले आहे. तसेच यातील काही प्रसंगामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल असंही त्यांचं म्हणणं आहे.
हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी करून सिनेमा जगभरात रिलीज करण्यावर बंदी घातली आहे. कोर्टाने निर्मात-दिग्दर्शक यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
close