विद्यापीठाच्या परीक्षेवर निवडणुकांचं सावट

March 6, 2014 10:11 AM0 commentsViews: 266

Image img_196782_mumbaiuniversity_240x180.jpg06 मार्च : ऐन परीक्षेच्या काळात लोकसभा निवडणुकांमुळे राज्यातील परीक्षांचं वेळापत्रक कोलमडणारेय. निवडणूक कार्यक्रमाचा फटका मुंबई आणि रायगड परिसरात 10, 17 आणि 24 तारखेला होणार्‍या निवडणुकींच्या कार्यक्रमामुळे सुमारे 476 पेपर पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.

निवडणुकीच्या काळात आर्टस्‌चे 226, कॉमर्सचे 68, सायन्सचे 166, टेक्नॉलॉजी विभागाचे 16 पेपर होणार होते पण आता हे सर्व परिपुढे ढकलण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला असून महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.  मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षाही याच कालावधीत होणार होत्या.  यातील १७ आणि २४ एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मतदान होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने १०, १६,१७ आणि २४ एप्रिल रोजी होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा विभाग लवकरच सुधारित वेळापत्रक जाहिर करणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केलं आहे. शिक्षकांना निवडणुकीचे काम करायला लागणार असल्यानं परीक्षांचे निकाल लांबण्याची चिन्हं आहेत.

close