तान्हुल्याला वाचवण्यासाठी चौहान कुटुंबाची धडपड

March 6, 2014 9:18 AM0 commentsViews: 2280

06 मार्च :  घरात नुकत्याच जन्माला आलेल्या तान्हुल्याला वाचवण्यासाठी एक वेळचं जेवण घेऊन बाळाचा खर्च करण्याचा बिकट प्रसंग नालासोपार्‍यातल्या चौहान कुटंबियांवर आला आहे आणि त्यांना गरज आहे आपल्या मदतीची.

अरुणा यांनी आठ महिन्यांच्या बाळाला जन्म दिला तेव्हा त्याचं वजन होतं 1 किलो 50 ग्रॅम त्यामुळे त्याला NICUमध्ये ठेवावं लागलं होतं. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही या कुटुंबाने अडीच लाखांचा खर्च सोसला आणि त्यासाठी घरातले दागिनेही विकले पण आता मात्र हा खर्च सोसणं कठीण झालंय.

KEM आणि नायर रुग्णालयातल्या मोठ्या वेटिंग लिस्ट मुळे येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. सध्या एक वेळचं जेवण घेऊन हे कुटुंब बाळाचा खर्च कसाबसा भागवण्याचा प्रयत्न करतंय. सध्या त्यांनी खाजगी रुग्णालयातून एक थर्माकोलचा डब्बा आणून त्यात या बाळाला ठेवलं आहे.

योग्य व्यवस्था नसल्यानं या बाळाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हे आईबाप बाळाला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतायत पण आता त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची .

या बाळाच्या परिवाराला आर्थिक मदत तुम्हाला करायची असल्यास, तुम्ही त्याच्या वडिलांना संपर्क करा. रमेश चौहान यांना तुम्ही 09637160329 या नंबरवर संपर्क करू शकता.

close