राजीव गांधींच्या मारेकर्‍यांचा सुटकेचा मार्ग बंद

March 6, 2014 12:23 PM0 commentsViews: 218
rajivgandhiassa__161270058906 मार्च : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील तीन आरोपींच्या सुटकेला तातडीने स्थगिती दिल्यानंतर या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी 26 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सातही आरोपींना कारागृहातच रहावे लागणार आहे.
 
तमिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या सातही मारेकर्‍यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी वेळी सुरवातीला संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांच्या सुटकेला तातडीने स्थगिती देण्यात आली होती.

close