युरोपातली वोक्स वॅगन ऑटो कंपनी भारतीय बाजारपेठेत

March 12, 2009 4:30 PM0 commentsViews: 2

12 मार्च, मुंबई संदीप श्रीकांतयुरोपातली ऑटो कंपनी वोक्सवॅगन आता भारतीय बाजारात उतरतेय. कंपनी लवकरच त्यांची पोलो ही गाडी भारतात लॉन्च करणार आहे. आणि या पोलोला स्पर्धा आहे ती स्कोडाच्या फॅबियाशी.जिनिव्हाच्या ऑटो शोमध्ये मंदीचा परिणाम जराही दिसला नाही. युरोपमधली ऑटो कंपनी वोक्सवॅगननं पोलो ही गाडी पुढच्या वर्षीच्या जानेवारीमध्ये भारतीय मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली. पोलो या गाडीला युरोपमध्ये चांगली मागणी आहे. " ही गाडी भारतीय मार्केटमध्ये नक्कीच चालेल. मॉडेल, डिझाइन किंवा इंजीन असो भारतीय लोकांच्या मागणीनुसार अगदी योग्य गाडी आहे, " असं भारतातल्या वोक्सवॅगन कंपनीचे एमडी जॉर्ज म्यूलर म्हणाले. पोलो ही गाडी वोक्सवॅगनच्याच गोल्फ या गाडीप्रमाणं आहे. मात्र मार्केटमध्ये पोलोची टक्कर स्कोडाच्या फॅबियाशी आहे. आणि भारतात फाबियाची मागणी चांगली आहे. " गाडीच्या किंमतीबाबत काहीही बोलणं आता योग्य होणार नाही. ही प्रीमियम सेगमेंटमधली गाडी असेल. आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाईल" अशी माहिती वोक्सवॅगन बोर्डचे सदस्य जोकेम हीजमॅन यांनी दिली. वोक्सवॅगनची ही गाडी चाकणमधल्या प्लान्टमध्येच तयार होणार आहे. त्यामुळं उत्पादनखर्चही कमी लागेल. मात्र पोलो मार्केटमध्ये येण्याच्या आधी हे वर्ष स्कोडासाठी खूप चांगलं आहे. कंपनी त्यांचं लॉरा हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. 2010 मध्ये स्कोडाची फोर बाय फोरची येटी ही नवी गाडी येणार आहे.

close