तिसर्‍या आघाडीसाठी राज-कोरे यांच्यात चर्चा

March 6, 2014 4:51 PM1 commentViews: 3887

Image raj_thakary2325_300x255.jpg06 मार्च : महायुतीच्या ‘यार्डात’ मनसेचं इंजिन लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्यात तिसरी आघाडीचे संकेत मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या आघाडीच्या धर्तीवर राज्यातही आता तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न होतोय.

यासाठी शेकापचे जयंत पाटील, जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे आणि शिक्षक आमदार अपुर्व हिरे यांनी आज (गुरुवारी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. राज यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन नेत्यांनी भेट घेतली. बिगर भाजप आणि काँग्रेस असा पर्याय देण्यासाठी आज प्राथमिक चर्चा झाल्याचं विनय कोरे यांनी स्पष्ट केलं.

तसंच अन्य समविचारी पक्षांनाही सोबत घेणार असल्याचंही कोरे म्हणाले. अलीकडेच भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत गडकरी यांनी लोकसभा लढू नका असं आवाहन राज यांना केलं. तसंच महायुतीत येण्याचं निमंत्रणही दिलं. पण राज यांनी महायुतीत जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतलीय. मात्र राज-गडकरींच्या भेटीमुळे महायुतीच्या गोट्यात अस्वस्थता पसरली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला. मत विभाजन टाळण्यासाठी राज यांची भेट घेतली असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं. पण आता राज यांनी तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले आहे.

  • Vikram

    after election hech sagle paksha chauthi(4th 5th 6th) aghadi suddha banavtil , adhik samavichari vichar karun :D

close