राडा प्रकरणी ‘आप’ला निवडणूक आयोगाची नोटीस

March 6, 2014 5:57 PM1 commentViews: 579

546 aap _bjp06 मार्च : मुद्यावरुन गुद्यावर आलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीतला राडा चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता या प्रकरणी दिल्ली निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला नोटीस बजावलीय.

निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसंच आपच्या कार्यकर्यांनीच हिंसाचाराला प्रवृत्त केलं आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, असा अहवाल दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे दिला आहे.

आपचे नेते अरविंद केजरीवाल बुधवारी गुजरातमध्ये चार दिवसांच्या दौर्‍यासाठी दाखल झाले. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी केजरीवाल यांच्या ताफ्याला अडवलं आणि चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं. पण आपल्या नेत्याला अडवलं म्हणून संतप्त आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर राडा घातला.

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या प्रत्युत्तर दिलं. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तुफान दगडफेक झाली. यानंतर लखनौ आणि अलहाबादमध्येही भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी बुधवारी रात्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली पण आज (गुरुवारी) सकाळी आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष आणि शाझिया इल्मी यांच्यासह 14 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. पण नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरुनच आपल्यावर कारवाई करण्यात आली अशी टीका आशुतोष यांनी यावेळी केली.

  • http://batman-news.com chetan

    Nautanki …

close