कांदिवलीतला मोबाईल चोर निशांत परमारला अटक

March 12, 2009 4:34 PM0 commentsViews: 4

12 मार्च, मुंबई मुंबईत कांदिवली पोलिसांनी निशांत परमार या मोबाईल चोराला अटक केली. दोन वर्षांपूर्वी निशांतला त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतर त्यानं झटपट पैसे मिळवण्यासाठी मोबाईल चोरी करायला सुरुवात केली. निशांत बिअर बार आणि पबमध्ये येणार्‍या युवकांशी मैत्री करायचा. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला एक फोन करायचा आहे पण माझ्या फोनची बॅटरी संपलीये असं सांगुन निशांत त्या युवकांचे मोबाईल फोन घेऊन पळ काढायचा. कांदिवली पोलिसांत निशांतविरोधात अशा तीन तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याचा एक स्केच प्रसिद्ध करून कांदिवलीच्या चारकोप भागातून अटक केलं. निशांतकडून 15 मोबाईल फोन आणि एक सोन्याची चैन जप्त करण्यात आली.

close