मोदींच्या दारावर केजरीवालांचा राडा !

March 7, 2014 12:16 PM4 commentsViews: 3144

kejirwal_ahdabad21_338x22507 मार्च : ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) आपण गुजरातमध्ये जे काही पाहिलं त्याविषयी चर्चा करायला मी  नरेंद्र मोदींच्या घरी जाणार असल्याचे जाहीर केलं. पण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवालांना भेटायला नकार दिला आहे.

अरविंद केजरीवाल मोदी यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी जात अस्ताना अहमदाबाद पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवलं. मोदींना भेटण्याची पूर्वपरवानगी केजरीवालांकडे आहे का याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना आडवलं  होतं.

मोदींच्या भेटीची वेळ घेण्यासाठी मनीष सिसोदिया जात होते. पण मोदींनी या भेटीला नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल आता अहमदबाद एअरपोर्टच्या दिशेने निघाले. तर अशी घोषणा करण्याच्या आधी केजरीवाल यांनी आधी मोदींच्या भेटीची वेळ का घेतली नाही, असा सवाल भाजपनं केला.

दरम्यान, ‘गुजरातच्या विकासासंदर्भात आत्तापर्यंत खूप चर्चा झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत आम्ही याच्या नेमके उलटे चित्र पाहिले आहे. गुजरातमध्ये जे सांगितले जात आहे त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती आहे. आम्ही मोदी यांच्या निवासस्थानी आत्ताच जाऊन त्यांची भेट घेणार आहोत व त्यांना यासंदर्भात 16 प्रश्‍न विचारणार आहोत,’ असे केजरीवाल यांनी सांगितले.

‘गुजरात भ्रष्टाचार मुक्त राज्य आहे असा मोदी दावा करतात पण गुजरातमधील बहुसंख्य जनता गुजरात मध्ये असलेल्या भ्रष्टाचाराविषयी बोलतेय, मग मोदी भ्रष्टाचारमुक्त गुजरात हा दावा कुठल्या आधारावर करतायत,’ असा सवाल असे केजरीवाल यांनी यावेळी केला.

 • p4 peace

  Kejriwal is funded by whom? ISI? Ford Foundation or the Commumists? Looks like all…. to disturb stability in INDIA….. ALL WANTS THAT!

 • Akshay Gawali

  केजरीवाल गुजरात में मोदी को ढूढं रहा है
  और दिल्लीवाले हाथ में चप्पल लेके केजरीवाल को

 • mithun nikam

  narendra modi yaani kejrival yaana betayla pahije hote, modi yaanchya mhannya pramane gujrat madhe jar khrokhar vikas jalela aaahe tar, modini bindas bethyla pahije, aani 16 kaay anek prshnachi utar dyala pahije..nahi tar maj sarkha aam admi kay vichar karel, yacha bjp kiva modi vichar hi karu shakat nahi…? jai bhim jai maharastra..

 • Priyanka Kamath

  Modi ni dilela kejriwal bhetila nakar mhanjech modi khotch bolat aahet kar nahi tyala dur kashala. 16 ch question sathi modi answer dyayala tayar nahit tar jantechi thousand question la kay answer denar. yacha janteni jarur vichar karawa. Apal yogya mat ajibath waya ghalu naye. Modi PM padala bilkul yogya nahi. Congress chya aagitun baher yeun Modi-BJP chya khaddyan Padu Naka. Me 1 Sarvasadharan person aahe.

close