रक्त चंदनाची तस्करी – आयबीएन नेटवर्कची स्पेशल इनवेस्टिगेटिव्ह स्टोरी

March 12, 2009 4:37 PM0 commentsViews: 70

12 मार्च, नवी दिल्लीसुमन चक्रवर्ती चंदन अतिशय दुर्मीळ असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी किंमत मिळते. त्यातही रक्त चंदनाचं झाड तर अतिशय दुर्मीळ असतं. सोन्यापेक्षाही याचा भाव जास्त असतो.अतिशय दुर्मीळ आणि महाग समजल्या जाणार्‍या रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होतेय. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूनच्या बॉर्डरवरच्या दोन माफियांनी वीरप्पनलाही या तस्करीत मागे टाकलंय.वीरप्पन… चंदनतस्करीतला शहनशाह…. पोलिसांच्या गोळ्यांनी त्याचा खातमा केला, पण तरीही ही चंदनतस्करी थांबली नाही. सोन्यापेक्षाही महाग असलेलं हे रक्तचंदन कुड्‌डापाह आणि छित्तूरमधून निर्यात होतं. संपूर्ण जगात फक्त इथंच रक्तचंदनाची झाडं आढळतात. इथल्या 100 किलोमीटरच्या विशेष पट्‌ट्यात ही झाडं आढळतात आणि त्याचं प्रमाण आहे, जगातल्या एकूण जमिनीपैकी 0. 0000675%. यावरून अंदाज येईल की ते किती महाग आहे. सॉद्बीज्‌च्या लिलावात 18 व्या शतकातला चीनमधलं रक्तचंदनाचं फर्निचर साडेतीन लाख अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं. आणि आता तर चीन आणि जपानमध्ये तर रक्तचंदनाची रोजच तस्करी होतेय. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि मणीपूरमधले माफिये यामागे आहेत, त्यांना राजकीय वरदहस्तही आहे. आणि त्यांचे सूत्रधार आहेत दोघंजण…वीरय्या शेखर उर्फ मोरे शेखर हा मणीपूर बॉर्डरवरच्या मोरे या छोट्या गावात असल्यामुळे तो मोरे शेखर म्हणून ओळखला जातो. त्याला काही भाजप नेत्यांचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं. शेखर दिल्ली, कोलकाता, आंध्रप्रदेश आणि चेन्नईतली सूत्र हलवतो. चेन्नईत कृष्णास्वामी उर्फ अप्पू हा सुद्धा एक प्रमुख माफिया आहे. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हत्येमागचा तो प्रमुख सूत्रधार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत त्याचे घनिष्ट संबंध आहेत.

close