राज – गडकरींच्या भेटीमध्ये काहीही गैर नाही – मनोहर जोशी

March 7, 2014 3:20 PM0 commentsViews: 1845

manohar joshi on07 मार्च : भाजप नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये काहीही गैर नाही असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं. या भेटीवरून सामनामध्ये गडकरींवर कडक टीकाही करण्यात आली होती तसचं उद्ध ठाकरेंनीही तीव्र नापसंती व्यक्त केली होती, त्यामुळे मनोहर जोशींच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवडणूकांमध्ये एक-एक मत महत्वाचं असतं अशा परिस्थीत ही मतांसाठी भेट होत असेल तर त्यात चूक नाही. यापुर्वी ही मुंडे राज यांना भेटले होते. मग गडकरी भेटू शकतात. पण मनसेला सोबत घेण्याचा निर्णय सर्वस्वी शिवसेनापक्ष प्रमुख उद्ध ठाकरे यांचाच असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं.

 

close