बिग बी बसले पंगतीत!

March 7, 2014 4:14 PM0 commentsViews: 2328

07 मार्च :  अमिताभ बच्चन… नाव जितकं मोठं, तितकंच सर्वांना आपलंसं वाटणारे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली रायगड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा कार्यक्रमात. ‘स्वदेश फाऊंडेशन’च्या वतीने ग्रामीण भागातल्या सामाजिक प्रकल्पांना बिग बी आणि जया बच्चन यांनी भेट दिली. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळासा भागातल्या खामगाव इथे ‘स्वदेश फाऊंडेशन’तर्फे पास्टी हायस्कुल समवेत पागळोली गावातील पाणीप्रकल्प आणि शेतीवरील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी गावकर्‍यांसोबत अतिशय साध्या पध्दतीनं भोजनाचा आस्वाद घेतला.

close