रंगांच्या फुग्यानं फाटली संजय काजरेंच्या डोळ्यांची पापणी

March 12, 2009 4:42 PM0 commentsViews: 5

12 मार्च, मुंबई धुलिवंदनाच्या दिवशी डोंबिवली आणि कोपर स्टेशनच्या दरम्यान रंगानं भरलेला फुगा डोळ्यावर लागून संजय काजरे जखमी झालेत. मानखुर्दला राहणारे काजरे डोंबिवलीच्या नवरंग कंपनीत माथाडी कामगार म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास काजरे डोंबिवली आणि कोपर स्टेशनच्या दरम्यान रेल्वेच्या दरवाजात उभे होते. त्याचवेळी समोरच्या झोपडपट्टीतून रंग आणि दगडांनी भरलेला एक फुगा त्यांच्या चेहर्‍यावर लागला. त्यात काजरेंच्या डाव्या डोळ्याची पापणी फाटली तर उजवा डोळा निकामी होण्याची भिती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबद्दल डोंबिवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असुन काजरे यांच्यावर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close