राष्ट्रवादीचे आणखी 3 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात?

March 7, 2014 4:43 PM0 commentsViews: 7618

ncp list 3407 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी तीन मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. रायगडमधून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, जालन्यातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, हातकणगंलेतून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसबरोबर जागांच्या अदलाबदलीच्या घोळामुळे उशीर होत असल्यामुळे राष्ट्रवादीने आपली तयारी पूर्ण केली असून जागांच्या अदलाबदली झाली नाही तर तीन मंत्र्यांना उमेदवारी निश्चित दिली जाईल असे संकेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले आहे. तसंच 10 मार्च रोजी गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली पण काँग्रेसने अजूनही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे आघाडीच्या वरीष्ठ पातळीवर जागांच्या अदलाबदलीचा निर्णय झालाय. हिंगोलीच्या बदल्यात काँग्रेस रायगडची जागा सोडायला तयार आहे. हिंगोलीमध्ये काँग्रेसकडून राजीव सातव उभे राहत असतील तर रायगडमधून सुनील तटकरे उभे राहु शकता. तसंच जालन्याची जागेची हातकणगंलेच्या जागेशी अदलाबदल करण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे.

तसा आग्रह राष्ट्रवादीने काँग्रेसकडे धरला आहे. तसं जर झालं तर जालन्यातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते. जर हातकणगंलेची जागा काँग्रेसने आपल्याकडे ठेवली तर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना राष्ट्रवादी उमेदवारी जाहीर करेल. येत्या 10 तारखेला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बीडमध्ये आघाडी सरकार प्रचाराचा नारळ फोडणार आहे. बीडमध्ये आघाडी संयुक्त सभा घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि माढामधून विजय सिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी देण्यात आलीय.उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. ‘भुजबळांना दिल्लीला पाठवू नका’ यासाठी भुजबळ समर्थकांनी येवल्यात कडकडीत बंद पाळता होता.  तसंच विधानसभेसाठी अजित पवार यांच्यासाठी मैदान मोकळे करण्यासाठी डाव असल्याचा शंकाही उपस्थिती केली जात आहे.

close