आता शेलार-तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

March 7, 2014 7:18 PM0 commentsViews: 2427

2346tawade raj meet07 मार्च : भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा वाद सुरू असताना आज (शुक्रवारी) मुंबईत भाजपचे नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

शेलार -तावडे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’वर जाऊ न भेट घेतली आहे. ही भेट लोकसभेच्या दृष्टीने नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं. 20 मार्च रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडे दोन उमेदवार आहेत पण त्यांना अकरा मत कमी पडत आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना मनसेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासाठीच ही भेट असल्याचं तावडे यांनी म्हटलं.

या तीनही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. पण गडकरी आणि राज यांच्या भेटीमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. सेनेच्या नेत्यांनी या भेटीबद्दल जळजळीत प्रतिक्रिया दिली होती एवढेच नाही तर सामनाच्या मुखपत्रातून या भेटीबद्दल चांगलीच आगपाखड करण्यात आली होती. आता शेलार तावडे यांनी भेट घेतल्यामुळे सेनेची आणखी गोची झालीय.

close