अवकाळी पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी !

March 7, 2014 8:51 PM2 commentsViews: 720

07 मार्च : गेला आठवडाभर मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीनं झोडपून काढलंय. उत्तर महाराष्ट्रालाही गारपिटीचा तडाखा बसलाय. यामुळे अख्खा रब्बी हंगाम वाया गेलाय. राज्यातला शेतकरी नुकसान भरपाईची वाट बघतोय पण काही ठिकाणी अजून पंचनामेही सुरू झालेले नाहीत.

वाशिममध्ये झालेल्या गारपिटीत रस्त्याच्या कडेला साचलेला हा गारांचा ढीग. इथे वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. गहू, हरभरा या रब्बी पिकांबरोबरच फळबागांनाही याचा जोरदार तडाखा बसला.

बीड जिल्ह्यात सलग 3 दिवस अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतात जागोजागी गारांचा खच आणि त्यामुळे पिकांची नासाडी हे दृश्य तर सगळीकडेच बघायला मिळतंय. गेवराईमध्ये संध्याकाळी अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यात मनुष्यहानी झाली नाही . मात्र पिकांचं प्रचंड नुकसान झालं.

जालना जिल्ह्यात काही भागात जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे 587 गावांमध्ये पीक आणि फळबागा हातच्या गेल्यायत. आंबा, मोसंबी, केळी या फळबागांबरोबरच ज्वारी , गहू ही रब्बी पीकं तर हातची गेलीयत.

नांदेड जिल्ह्यात देगलूर , कंधार , लोहा , मुखेड , नयागाव या तालुक्यांना गारांचा तडाखा बसला. ज्वारी, गहू , मक्याचं पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहे. पण इथे पंचनाम्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही.

परभणी जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीत तब्बल 76 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारनं पंचनामे सुरू केलेत पण प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार हे सांगायला कुणीही तयार नाहीये.

उत्तर महाराष्ट्रालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. निफाड आणि सिन्नर तालुक्यात गारपीटीमुळे द्राक्षबागा आडव्या झाल्यात. द्राक्षाचे मणी गळून पडलेत. गहू आणि उन्हाळी कांद्याची पातही या गारपिटीनं झोडपून निघालीय.

अहमदनगर जिल्ह्यालाही सलग तिसर्‍या दिवशी गारपीट आणि मुसळधार पावसानं झोडपलं. पाथर्डी,शेवगाव, श्रीगोंदा, नगर, आणि कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. यामुळे शेतीचं नुकसान झालंय.

सोलापूरमध्येही पंढरपूर तालुक्यात गारपिटीमुळे 353 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. या गारपीटीत एका नऊ महिन्यांच्या मुलीसह तिघा जणांना आपला जीव गमवावा लागलाय. गारपीटीमुळे झालेलं नुकसान कोण भरून काढणार हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत गर्क असलेल्या राजकारण्यांना आपल्या दुखाकडेही लक्ष द्यायला वेळ मिळेल ही आशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आहे.

 • Swapnil Shahapure

  Hi Nikhil sir,
  This is very bad thing , due to heavy ice rain lot of losses happen in maharastra.
  Now all ministers are saying we will send commtiee , they will do post martam.
  Only postmartm but really approved money fund is reaching to farmer.
  Food is the basic need of life for every human being.
  Immediately realease 100% recovery to farmer.
  Farmer is the backbone of all existing industry.
  we are wasteing lot of money in adhiveshan and ministry meetings, alot this amount to farmer.
  Bharat ha shtipradhan desh ahe
  Rgds,
  Swapnil

 • mayur patil

  गारपीट आणि पाऊस या नैसर्गिक अप्पातींनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्तिति लक्षात घेऊनच यायला हव होत.

  महाराष्ट्रातील तमाम पिठीत आणि शोषित वर्गाच नशीबच फुटकं कि या महाराष्ट्रतात जन्माला आले.

  तमाम नराधमांनी साठवून ठेवलेली संपत्ती election fund साठी बाहेर येतेय पण आत्महत्या केलेल्या शेतकर्यासाठी नाही येणार….

  आणि हीच संपत्ती बाहेर काढण्यासाठी आचारसंहिता हा काळ सर्व गावकर्यांनी हताश होऊन न जाता आपल्या फायद्या साठी करवा

  प्रत्येक गाव गावांनी एकत्र येउन आपल्या गावातील एकात्मता, संकटात साथ देण्याची माणुसकी दाखून, आपल्यासाठी , आपल्या माणसांसाठी

  एकत्र याव आणि प्रत्येक गावात एक लोकसभेचा संभव्या उमेद्वार जाहिर करावा . त्याच्या मागे सर्व गावकर्यांनी सर्व ताकदीने उभ रहाव.

  मग उमेद्वार मग घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षाकडून तुम्हाला offer येईल एवडे पैसे देतो पण उमेद्वार मागे घ्या हे पैसे सर्व पक्षाकडून घेऊन आपल्या

  गावातील अप्पातींना मदत करता येईल.

  समोरचा जर मुजोर असेल तर महाराष्टातील जनतेने हा ” शिवाजी मार्ग ” अवलंबवावा.

close