27-21 फॉर्म्युल्यावर काँग्रेस ठाम

March 13, 2009 4:46 AM0 commentsViews: 1

13 मार्च दिल्लीगुरुवारी रात्री नवी दिल्लीत काँग्रेसच्या राज्य संसदीय दलाची बैठक झाली. राष्ट्रवादीबरोबरच्या जागावाटपात काँग्रेस अजूनही 27-21 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी सांगितलंय. बैठकीत जागा वाटपावर चार तास चर्चा झाली. जागावाटपाची चर्चा आज पूर्ण होणार असल्याची माहिती कृपाशंकर सिंग यांनी दिली. त्यानंतर दोन दिवसांत उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

close