शरद पवारांच्या प्रचाराचा धडाका सुरूच

March 13, 2009 5:48 AM0 commentsViews: 76

13 मार्च शरद पवार यांचा झंझावती दौरा सुरूच आहे. शरद पवार दिवसभरात पाच सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली प्रचार सभा त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी गावात घेतली. या सभेत बोलताना, एकाच पक्षाने देश चालविण्याचे दिवस आता संपलेत.त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच देश चालवला पाहिजे असं म्हणाले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केली. जागतिक मंदीमुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट उभं आहे. पण मनमोहनसिंग यांच्या कुशल नेतृत्त्वामुळेच आपल्यावर मंदीचा परिणाम कमी प्रमाणात झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आता यापुढे एकमेकांच्या विचारांचा आदर करूनच वाटचाल शक्य आहे, असं ते आपल्या भाषणात म्हणाले.

close