मलेशियन विमान समुद्रात कोसळले

March 8, 2014 2:58 PM0 commentsViews: 3495

vietnam_flight08 मार्च : मलेशियन एअरलाईन्सचं बीजिंगला जाणारं विमान समु्रदात कोसळलंय. दक्षिण चिनी समुद्रात विमान कोसळण्याची माहिती व्हिएतनाम मीडियानं दिलीय. या विमानात 12 कर्मचार्‍यांसह 227 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये 5 भारतीयांचा समावेश असल्याचं कळतंय.

त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जात आहे. मलेशिया एअरलाईन्सचे बोईंग श्रेणीतील या प्रवासी विमानाने क्वाललांपूर येथून मध्यरात्री साडेबारा वाजता बिजिंगसाठी 12 कर्मचार्‍यांसह 227 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलं होतं. मात्र, दक्षिण चीनच्या समुद्रावर उड्डाण करत असतांना अचानक विमानाचा संपर्क तुटला.

विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्त सुरू झाला. पहाटे तीनच्या सुमारास विमान व्हीएतनामाच्या हवाई हद्दीत असण्याचा अंदाज होता पण अचानक हे विमान रडारवर दिसेनासे झाले. त्यानंतर हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती माध्यमांनी दिली. अजूनही विमान कुठे कोसळले याचा शोध लागू शकलेला नाही.

close