अभिजीत पानसे मनसेच्या वाटेवर ?

March 8, 2014 2:40 PM0 commentsViews: 1316
 अभिजीत पानसे मनसेच्या वाटेवर ?

अभिजीत पानसे मनसेच्या वाटेवर ?

08 मार्च : शिवबंधनाचा धागा तोडून शिवसैनिक सेनेला जय महाराष्ट्र करत आहे. आता शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे मनसेच्या गळाला लागले आहे.

अभिजीत पानसे मनसेच्या वाटेवर आहे. उद्या रविवारी होणार्‍या मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते मनसेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. विद्यार्थी सेनेचं युवा सेनेत विलिनीकरण केल्यामुळे अभिजीत पानसे नाराज असल्याची चर्चा होती. आणि त्यानंतर आता ते मनसेच्या वाटेवर असल्याचं कळतंय.

अभिजीत पानसे हे शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेचेही माजी अध्यक्ष आहेत. मात्र शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदावरुन पानसे यांना हटवण्यात आलं आणि त्यांची जागा आदेश बांदेकर यांना देण्यात आली. त्यामुळे पानसे नाराज झाले. त्यामुळे पानसे आता मनसेत प्रवेश करणार आहे.

मनसेत प्रवेश केल्याच्या बदल्यात पानसे यांना थेट लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याचं कळतंय. पानसे यांना ठाण्यातून राजन विचारे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

close