होय, गडकरी आणि मुंडे यांच्यात मतभेद होते -तावडे

March 8, 2014 3:10 PM0 commentsViews: 2078

twade on 3408 मार्च : भाजपचे नेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात वाद असल्याचं भाजपनं पहिल्यांदाच कबूल केलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीच याला दुजोरा दिलाय. पण, आता हा वाद निवळल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

महायुतीत मुंडेंचा शब्द प्रमाण मानणार्‍या शिवसेनेनं मुंडेंचंच ऐकलं नाही. मुंडेंच्या विनंतीनंतरही शिवसेनेनं विधान परिषदेसाठी दोन उमेदवार दिले, असंही विनोद तावडे म्हणाले. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसंच मनसेला महायुतीत घेण्यासाठी प्रयत्न करू असंही गडकरी यांनी सांगितलं होतं. पण या भेटीमागे गडकरी-मुंडे वादाची किनार होती अशी शंका व्यक्त केली जात होता. पण गोपीनाथ मुंडे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाही असं स्पष्ट केलं. पण गडकरी हे राष्ट्रीय नेते आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या कोणत्याही बैठकीत हस्तक्षेप केला नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि आपण हा विषय पाहत आहोत असं सांगत मुंडेंनी गडकरींनी बाजूला सारलं.

पण आता विनोद तावडे यांनी गडकरी -मुंडे यांच्यात मतभेद होते असं कबूल केलंय. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली याबद्दलही त्यांनी खुलासा केला. आरपीआयला महायुतीत शिवसेनेनं आणलं. त्यानंतर महायुतीत जागा वाटप झाल्या होत्या. त्यावेळी आरपीआयला राज्यसभेची जागा भाजपच्या कोट्यातून देण्यात आली. यासाठी भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना जागा दिली गेली नाही. एवढं असतानाही विधान परिषदेसाठी सेनेनं दोन उमेदवार उभे केले. जर सेनेनं एक उमेदवार उभा केला असता तर निवडणूक बिनविरोध झाली असती पण सेनेनं मुंडेंचा शब्द न पाळता दुसरा उमेदवार उभा केला त्यामुळे आम्हाला मनसेची मदत घ्यावीशी वाटली असंही तावडे यांनी स्पष्ट केलंय.

close