आयपीएल स्पर्धा आयोजनाचा घोळ कायम

March 13, 2009 6:33 AM0 commentsViews: 3

13 मार्चआयपीएल स्पर्धा दरम्यानच्या सुरक्षेवरची टांगती तलवार अजूनही कायम आहे. आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचलाकांनी तर लोकसभा निवडणुकी दरम्यान आयपीएलचं आयोजन करण्यास आक्षेप घेतलाय. लोकसभा निवडणुकी दरम्यान सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड ताण असतो. म्हणून लोकसभा निवडणुकीनंतरच आयपीएलचं आयोजन करावं असा अहवाल आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी दिला आहे. तसंच राजस्थान आणि दिल्लीनं अजूनही आयपीएलच्या आयोजना संदर्भातील अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेला नाही.या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम गृहमंत्रालयातल्या उच्च अधिका-यांशी चर्चा करणार आहेत. येत्या 10 एप्रिलपासून आयपीएलच्या स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

close