अखेर काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आघाडीचा 27-21 चा नवा फॉर्म्युला

March 8, 2014 9:21 PM0 commentsViews: 4633

Image img_219692_congressncp4_240x180.jpg08 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीसोबत आघाडीमध्ये 22-26 चा फॉर्म्युला मोडती निघालाय. त्यामुळे 27-21 असा फॉर्म्युला तयार झाला आहे.

22-26 च्या फॉर्म्युल्यासाठी हट्ट धरुन बसलेल्या राष्ट्रवादीला यामुळे माघार घ्यावी लागली आहे. काँग्रेसने आपल्या 27 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांची यादी जाहीर केलीय.

या यादीत उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली. उत्तर पश्चिम मुंबईमधून गुरुदास कामत कामत, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त तर दक्षिण मध्य मुंबई एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्याच होम ग्राऊंडवरुन निवडणूक लढवणार आहे त्यांना सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आलीय.नागपूरमधून विलास मुत्तेमवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसमध्ये दाखल झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

अशी आहे काँग्रेसची पहिली यादी

 • उत्तर मुंबई – संजय निरुपम
 • मुंबई उत्तर पश्चिम – गुरुदास कामत
 • उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त
 • दक्षिण मध्य मुंबई – एकनाथ गायकवाड
 • दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा
 • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
 • सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
 • सांगली – प्रतिक पाटील
 • सिंधुदुर्ग – रत्नागिरी – निलेश राणे
 • नंदुरबार – माणिकराव गावित
 • धुळे – अंबरिश पटेल
 • रामटेक – मुकुल वासनिक
 • नागपूर – विलास मुत्तेमवार
close