सचिन शेवटच्या वनडेला मुकण्याची शक्यता

March 13, 2009 7:05 AM0 commentsViews: 6

13 मार्च भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पाचवी आणि अंतिम वन डे मॅच शनिवारी ऑकलंडमध्ये होणार आहे. पण पोटाला झालेल्या दुखापतीमुळे याही मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्चला झालेल्या तिस-या वन डेत सचिनने नाबाद 163 रन्सची तुफान खेळी केली होती. पण पोटाला बॉल लागल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे 45व्या ओव्हरमध्ये त्याला ती मॅच अर्धवट सोडावी लागली होती. हॅमिल्टनला झालेल्या चौथ्या वन डेतही सचिन खेळला नव्हता.पण पाचव्या आणि अंतिम वन डेत तो खेळेल असं म्हटलं जात होतं. पण दुखापतीमुळे तो अंतिम वन डेला मुकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड दौ-यावर असलेल्या भारतानं वन डे सीरिज 3-0 नं जिंकली आहे.

close