पोलीस महासंचालकपदी एस.एस.विर्क यांची नियुक्ती

March 13, 2009 2:35 PM0 commentsViews: 1

13 मार्च मुंबईराज्याच्या पोलीस महासंचालकपदी एस.एस. विर्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनामी रॉय यांची राजीनाम्यानंतर पोलीस महसंचालकपद रिकामं झालं होतं. नवीन डीजीपीची निवड करण्यासाठी सरकारला देण्यात आलेली मुदत आज संपली. त्यामुळे राज्य सरकारला एस.एस विर्क यांची नियुक्ती करावी लागली आहे. विर्क यांच्या नियुक्तीला निवडणूक आयोगानंही हिरवा कंदील दाखवला आहे. एन. एन. रॉय यांच्या नियुक्तीवर कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

close