शीळफाट्यात MIDC ची पाईपलाईन फुटली

March 8, 2014 11:04 PM0 commentsViews: 997

08 मार्च : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शीळफाटा परीसरातील पडले गावात एमआयडीसीची पाईपलाईन आज(शनिवारी) दुपारी 4 च्या सुमारास अचानक फुटली. जांभूळ डॅम इथून आलेली ही पाईपलाईन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत काही भागांना पाणीपुरवठा करते. ही लाईन फुटल्यानं परिसरातील काही भागांना कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलंय.

close