विमानाचा शोध सुरू; आतंकवादी कट असल्याचा एअरलाइन्सचा संशय

March 9, 2014 11:52 AM0 commentsViews: 1221
malaysia-airlines109 मार्च :  मलेशियाहून चीनमध्ये बीजिंगकडे जाणारे प्रवासी विमान शुक्रवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. विमानाचा संपर्क तुटून 36 तासांपेक्षाही जास्त वेळ झाला आहे. मलेशियन एअरलाइन्सने बेपत्ता विमान शोधण्यासाठी 94 बचाव अधिकार्‍यांची टीम पाठवली आहे. तर दूसरीकडे मलोशियन एअरलाइन्सच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत 2 प्रवासांचे पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले आहेत. विमानातील दोन प्रवासांनी बनावट पासपोर्ट दाखवत विमानात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. एअरलाइन्सने हा अतिरेकी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणात दहशतवादी संघटनाचा हात नसल्याचा अमेरिकी गुप्तचर संघटनांना संशय आहे, मात्र तशी शक्यताही कोणी नाकारलेली नाही.
विमानातील चार प्रवाशांकडे बनावट पासपोर्ट असल्याचे, मलेशियाचे कार्यकारी वाहतूक मंत्री हिसामुददीन हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ते म्हणाले, ‘विमानातील एकूण कितीजणांकडे असे खाटे पासपोर्ट होते आणि चोरीचे पासपोर्ट घेऊन हे लोक विमानात कसे चढले हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही’.
या विमानात पाच भारतीयांसोबतच 227 प्रवासी आणि वैमानिकांसह 12 सदस्य होते.
close