गारपिटीनं हैराण शेतकरींना पवारांनी दिलं मदतीचं आश्वासन

March 9, 2014 6:32 PM0 commentsViews: 671

09 मार्च :  केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीटने नुकसान झालेल्या वडगाव या गावात जाऊन शेतांची पाहणी केली. यावेळा त्यांनी गारपिटीने उद्‌ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला. पाहणीनंतर पवार यांनी ताबडतोब पंतप्रधान यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली, तसंच निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी लागेल असे सुचवले. पंतप्रधानांनी मदतीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

close