‘कृष्णकुंज’वर एकाचवेळी दोन भारतरत्न राज ठाकरेंच्या भेटीला

March 9, 2014 6:51 PM0 commentsViews: 2552
sachin lataमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त शुभेच्या देण्यासाठी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी गेले.
यावेळी सचिनने लता मंगेशकर यांच्या गायकीची तोंडभरून स्तूती केली.  तो म्हणाला, ‘मी लहान असताना वॉकमन आणि आता आयपॅडवर संगीत ऐकतो. यंत्र बदलत गेले गाणं मात्र लतादीदींचेच होते. त्या मला आईसारख्या आहेत.’
लतादीदीं म्हणाल्या, ‘मी चांगले गाते की नाही माहित नाही. मात्र सचिन उत्तम क्रिकेटर आणि चांगला माणूस आहे.’ क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. त्याने क्रिकेटला अलविदा केले असले तरी, त्याने दुसरा एखादा खेळ खेळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लतादीदींनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले ‘तु जहाँ जहाँ चलेगा… मेरा साया साथ होगा…’ गाणे सचिनला भेट दिले. तर, सचिनने त्याची स्वाक्षरी असलेले एक जर्सी, लतादीदींना भेट दिले.राज ठाकरेंनी दोघांचे स्वागत केले. ते म्हणाले, माझ्या घरात एकाच वेळी दोन भारतरत्न येण्याची ही पहिली वेळ आहे.

close