गडचिरोलीतल्या रणरागिणी

March 9, 2014 7:11 PM0 commentsViews: 243

महेश तिवारी,गडचिरोली
09 मार्च :  देशात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणार्‍या पोलीसांच प्रमाण देशभरात केवळ पाच टक्के असल तरी सर्वाधिक महिला पोलीस असल्याचा मान महाराष्ट्राला मिळालाय.त्यातही मुंबई-पुणे ही मोठी शहरे सोडल्यास माओवाद्यांच्या हिंसक कारवाया असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महिला पोलीसांची संख्या राज्यातल्या इतर जिल्ह्यातल्या तुलनेत जास्त आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे माओवाद्यांच्या भीतीने गडचिरोली जिल्ह्यात काम कऱणे धोक्याच मानलं जात असताना या जिल्ह्यात धोका पत्करुन पोलीस दलात काम कऱणार्‍या तरुणींची संख्या वाढत असुन नक्षलविरोधी अभियानात भाग घेण्यात महिला पोलीस आघाडीवर आहेत.

घनदाट जंगलातल्या 4 -4 दिवसांच्या मोहिमा असोत किंवा मग माओवाद्यांच्या हल्ल्याचा मुकाबला… घनदाट जंगल असो… वा सीमावर्ती भाग… ऊन – पाऊस – थंडीची पर्वा न करता तब्बल 900 महिला पोलिस सध्या गडचिरोलीत जीवाची बाजी लावून काम करतायत.

माओवाद्यांशी लढण्यासाठीचं गोरीला युद्ध तंत्र, आधुनिक शस्त्रात्रं हाताळणं. यात या महिला तरबेज आहेत. शिवाय दुर्गम भागातल्या पोलिस ठाण्यातली सगळी कामं या महिला समर्थपणे करतात.

गडचिरोली जिल्ह्यात बदली होणं म्हणजे शिक्षा समजलं जातं. बदली झालेले अनेक जण इथे रुजूच होत नाही. अशा वातावरणात या जिल्ह्याची सुरक्षा समर्थपणे करणार्‍या या रणरागिणींना सलाम!

close