बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ आणखी वाढले

March 10, 2014 11:24 AM0 commentsViews: 1039

malaysia crash10 मार्च :   मलेशियातील क्वालालंपूरहून बीजींगकडे निघाल्यानंतर बेपत्ता झालेल्या मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही. या विमानाला बेपत्ता होऊन 48 तासांपेक्षाही जास्त तास उलटले आहेत. यामुळे याचे गूढ आणखी वाढले आहे.

या विमानात एकूण 239 जण आहेत. यात 227 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. शनिवारी क्वालालंपूरहून उड्डाण केल्यानंतर तासाभरातच या विमानाचा रडावरुन संपर्क तुटला.

व्हिएतनाम नौदलाच्या विमानाने समुद्रात काही भाग दिसल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात जहाजांना तिथंही काहीही सापडलेले नाही.

विमानातल्या दोनजणांचे पासपोर्ट खोटे असल्याने घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

close