आमिर खाननं पोलिसांत दाखल केली तक्रार

March 9, 2014 7:28 AM0 commentsViews: 706

amir khan satyamev jayate09 मार्च :  बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ या शोचे दुसरे पर्व सध्या सुरु झाले आहे. या शोविरोधात सध्या सोशल नेटवर्किंग साइट आणि काही अँप्लिकेशनच्या माध्यमातून अपप्रचार सुरू आहे. या विरोधात अमिरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अमिर खान हा रियालीटी शो संपल्यानंतर लोकांकडून चॅरीटीच्या नावाखाली पैसे उकळतो. या पैशांचा वापर धार्मिक स्थळांच्या वापरासाठी होतो असा मेसेज सोशल नेटवर्किंग साइट आणि काही अँप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

या अपप्रचारामुळे अभिनेता अमीर खान व्यथित झाला असून त्याने याविरोधात पोलिस तसेच सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा अमिरने केला आहे.

 

close