‘ते’ विमान अजूनही सापडले नाही !

March 10, 2014 4:15 PM1 commentViews: 1875

malshiya air_new10 मार्च : मलेशियन एअरलाईन्सचं विमान बेपत्ता होऊन दोन दिवस उलटले आहे. पण, अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. 34 विमानं आणि 40 जहाजं या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेत आहेत. या शोधमोहिमेत तब्बल 8 देश सहभागी झाले आहेत.

या विमानाचे अवशेष सापडल्याचं खात्रीलायक वृत्त नसल्याचं मलेशियन प्रशासनानं म्हटलं आहे. या विमानातल्या दोन प्रवाशांकडे चोरीचे पासपोर्ट असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळे यामागे अतिरेकी घातपात आहे का, याचाही एफबीआयकडून शोध सुरू आहे.

शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मलेशिया एअरलाईन्सचे बोईंग श्रेणीतील या प्रवासी विमानाने क्वाललांपूर येथून बिजिंगसाठी 12 कर्मचार्‍यांसह 227 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलं होतं. यात पाच भारतीयांचा समावेश आहे. मात्र, दक्षिण चीनच्या समुद्रावर उड्डाण करत असताना अचानक विमानाचा संपर्क तुटला. पहाटे तीनच्या सुमारास विमान व्हीएतनामाच्या हवाई हद्दीत असण्याचा अंदाज होता पण अचानक हे विमान रडारवर दिसेनासे झाले. त्यानंतर हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती माध्यमांनी दिली. पण हे विमान नेमके कुठे कोसळले याचा शोध लागू शकलेला नाही.

  • rancho

    lavkar shodh lava

close