तावडे-शेलार पुन्हा ‘कृष्णकुंज’वर राज भेटीला

March 10, 2014 6:07 PM0 commentsViews: 2877

5858_raj tawade meet10 मार्च : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली. पण त्याच बरोबर आपले खासदार निवडून आले तर पंतप्रधानपदासाठी भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असं जाहीर केलं. त्यामुळे यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील जवळकी वाढतच चाललीय.

आज (सोमवारी) भाजप नेते विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी पुन्हा राज ठाकरे यांची भेट घेतली. तावडे-शेलार यांनी राज यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलीय. विधान परिषद निवडणुकीत मनसेची मतं निर्णायक ठरणार आहेत.

त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपचे नेते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पुन्हा कृष्णकुंजवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात उभे राहणार आहेत. पण, 9 व्या जागेवर दावा सांगणार्‍या उमेदवाराला मतांची बेगमी करावी लागणार असल्याने चुरस निर्माण झालीय. भाजपचे उमेदवार पांडुरंग फुंडकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज भरले आहे. भाजपला 11 मतांची गरज आहे यासाठी तावडे यांनी मनसेला साकडं घालण्यासाठी राज यांची भेट घेतलीय.

close